।। जय जय रघुवीर समर्थ ।।
श्रीदासनवमी शताब्दी महोत्सव
समर्थ सेवा संघ, पुणे
संस्थापक कै. न. म. कुलकर्णी ऊर्फ नामानंद रामदासी
आनंदाश्रम संस्थेचा महत्त्वाचा सांस्कृतिक यशाचा टप्पा
आनंदाश्रमाच्या सांस्कृतिक यशामध्ये आजून एक महत्त्वाचा यशाचा टप्पा म्हणून हा शताब्दी महोत्सव आम्ही साजरा करीत आहोत.
आनंदाश्रम संस्थेने या ऐतिहासिक शताब्दी महोत्सवासाठी संस्थेची वास्तू निःशुल्क उपलब्ध करून दिली आहे.
या महोत्सवात सहभागी होण्यासाठी आम्ही सर्वांना हार्दिक आमंत्रण देतो. सहभाग घेण्या साठी कोणतेही शुल्क लागणार नाही.
समर्थ सेवा संघ, पुणे तर्फे आयोजित करण्यात येत असलेला हा १००वा श्रीदासनवमी उत्सव संपन्न होत आहे. कै. नामानंद रामदासी ऊर्फ न. म. कुलकर्णी यांनी १०० वर्षांपूर्वी हा उत्सव सुरू केला. त्यांच्या पश्चात मित्रमंडळी, समर्थ भक्त आणि आनंदाश्रम संस्थेच्या सहकार्याने हा उत्सव आनंदाश्रमाच्या पवित्र वास्तूत वर्षानुवर्षे चालू आहे. अनेक चढ-उताराला सामोरे जात आम्ही शतकपूर्तीचा टप्पा गाठला आहे. कोविडच्या टाळेबंदीच्या काळात सुद्धा दासनवमी उत्सवात खंड पडला नाही. आपणा सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव आणखी दिमाखात चालू राहील व समर्थ रामदासस्वामी घरा-घरात पोहोचतील अशी आशा आहे.
दुपारी ४ ते ५.३०
कीर्तन सत्र
ह. भ. प. अंजलीताई कऱ्हाडकर
एम.ए. (संगीत), संगीत अलंकार. श्रीनारद विद्या मंदिर व लीलाताई गोळे यांचेकडे कीर्तन शिक्षण, कीर्तन स्वरमंजुषा पदवी प्राप्त. उत्तम संगीत व कीर्तन शिक्षिका, नाट्य अभिनय व नाट्य परिषदेचा दिवाकर पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार इ.
ह. भ. प. सौ. ऋचाताई प्रभुणे
बी. कॉम., एम.ए. (संस्कृत) कीर्तन विशारद, 'कीर्तन विश्व' या यू-ट्यूब चॅनेलसाठी कीर्तने, विविध ठिकाणी कीर्तन सेवा. गीताधर्म मंडळातून गीता संथा आणि गीता पाठशाळा उपक्रम पूर्ण.
ह. भ. प. श्री. श्रेयसबुवा कुलकर्णी
कीर्तन रत्न, कीर्तन भूषण, हरी कीर्तनोत्तेजक सभेचा युवा कीर्तनकार पुरस्कार, एक तपाहून जास्त काळ कीर्तन सेवा. भारतीय विद्या भवन येथे संस्कृत अध्यापन.
ह.भ.प. श्री. निहाल बुवा खांबेटे
बी.एड्. एस.इ.टी., एम्.ए. (संस्कृत). बृहन महाराष्ट्रात ३०० हून अधिक कीर्तने, बाल शिक्षण मंदिर, पुणे येथे संस्कृत शिक्षक.
ह. भ. प. सौ. निवेदिता मेहेंदळे
कीर्तनकार व तबलावादक, प्रेरणा - सासरे कै. अनंतबुवा मेहेंदळे. पुणे आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कीर्तनकार, पुणे मनपाचा मुक्ताई पुरस्कार. विविध ठिकाणी कीर्तनसेवा. रेणुका स्वरूप प्रशाला व ज्यु. कॉलेज या ठिकाणी शिक्षिका.
ह.भ.प. सुश्री तेजस्विनी कुलकर्णी
कीर्तन विशारद प्रथम क्रमांक, हरी कीर्तनोत्तेजक सभेचा युवती कीर्तनकार पुरस्कार, विविध ठिकाणी कीर्तनसेवा चालू आहे. आय टी कंपनीत जबाबदारीच्या पदावर.
ह.भ.प. श्रीमती सुनिती केळकर
एम्. ए. (संगीत), एम. ए. (मराठी) कीर्तन विशारद. स्वरझंकारच्या कार्यक्रमात गायन. १० वर्षांपेक्षा जास्त कीर्तन सेवा चालू आहे.
ह.भ.प. श्री. पुंडलिकबुवा हळबे
पारंपरिक पद्धतीने वेदांचे सांगअध्ययन, आचारसंपन्न पुरोहित. महाराष्ट्र व अन्य ठिकाणी कीर्तन सेवा. शारदा पीठाच्या प. पू. श्री. भारतीतीर्थ स्वामी महाराज यांचेकडून ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून सन्मान. विविध कीर्तनोपयोगी पुस्तकांचे लेखन व काव्यनिर्मिती.
निर्याण कीर्तन
ह.भ.प. श्री. पुंडलिकबुवा हळबे
तबला: श्री. चिन्मय वाईकर | संवादिनी: श्री. सुदिन जोशी / श्री. प्रसाद पटवर्धन
सायंकाळी ६ ते ७.३०
व्याख्यानमाला
प्रत्येक व्याख्यानापूर्वी एका वनस्पतीची माहिती मिळेल
समर्थांचे शिक्षणविषयक विचार
प्रा. श्री. द. महाजन
ज्येष्ठ वनस्पतीशास्त्र व पर्यावरणशास्त्र तज्ज्ञ. माजी जीवशास्त्र विभाग प्रमुख, गोखले कॉलेज, कोल्हापूर. निसर्ग पर्यावरण विषयात कार्य करणाऱ्या अनेक संस्थांचे मार्गदर्शक. वेस्टर्न अॅग्रि. हॉर्टी. सोसायटीचे विश्वस्त. अनेक पुस्तके प्रकाशित व काही प्रकाशनाच्या मार्गावर. ९४व्या वर्षी अजूनही कार्यरत - पुण्याचे भूषण.
मनाचे श्लोक व मनाचे आरोग्य
डॉ. राम साठ्ये
एम. डी. पॅथॉलॉजी, निष्कर्ष पॅथॉलॉजी लॅब. पुण्यात ४ शाखा, नाट्यअभिनेते, सामाजिक संस्थांना मदत कार्य, अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास, पुण्यात व पुण्याबाहेर १५०० पेक्षा जास्त व्याख्याने, समर्थ रामदास चतुःशताब्दी समिती संघटक, लाखो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व पुस्तक वाटप.
समर्थांचा राष्ट्रधर्म
श्री. पांडुरंग बलकवडे
ज्येष्ठ इतिहास संशोधक, मोडीलिपीतज्ज्ञ, शिवचरित्र व्याख्याते, भारत इतिहास संशोधक मंडळाचे सचिव. दासनवमी उत्सवात यापूर्वीही त्यांनी मार्गदर्शन केले आहे. महाराष्ट्र राज्य गडकोट किल्ले संवर्धन आणि विकास समितीचे मुख्य मार्गदर्शक.
समर्थ रामदास आणि भगवद्गीता
डॉ. मुकुंद दातार
एम.ए. (मराठी), एम.ए. (संस्कृत), पीएच.डी. (मराठी) महाविद्यालयीन प्राध्यापक व प्राचार्य (निवृत्त). गीता-तत्त्व-वृती, संतसाहित्य अभ्यासक, आणि सांस्कृतिक विचारक. अध्यक्ष गीता धर्म मंडळ, अध्यक्ष- सकल संत विचारमंच, पुणे. प्रमुख प्राध्यापक संत ज्ञानदेव अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (२०१८-२१).
समर्थांचा लोकसंग्रह
प्रा. अभय टिळक
संपादक, संशोधक, अनुवादक, स्तंभलेखक अशी ओळख असलेले अभय टिळक अर्थतज्ज्ञ आहेत. आळंदी देवस्थानचे विश्वस्त म्हणून सेवा केली आहे. संतसाहित्याचा प्रचंड अभ्यास आहे. 'अर्थबोध पत्रिका' या मासिकाचे संपादक. शहरीकरणाचा विस्तार आणि नागरी प्रदेशाचे अर्थशास्त्र हा विशेष अभ्यासाचा विषय.
दासबोध
डॉ. आरती दातार
माजी मराठी विभाग प्रमुख गरवारे महाविद्यालय, पीएच. डी. प्रबंधाला सुवर्णपदक, आदर्श शिक्षक, लेखक, व्याख्यात्या व प्रवचनकार. संतसाहित्य अभ्यासक, अनेक पुरस्काराने सन्मानित. गेली २५ वर्षे आपल्या उत्सवात श्रोत्यांना संतवाङ्मयाची ओळख करून देत आहेत. नुकतेच मिळालेले पुरस्कार राज्यस्तरीय गुणीजन गौरव पुरस्कार, कै. माई सावरकर पुरस्कार.
समर्थकृत "दखनी" उर्दू रचना
सुश्री मनीषा बाठे
संतवाङ्मय व बहुभाषा अभ्यासक, एम्.ए. गुजराती, एम्.ए. हिंदी, उर्दू भाषा पदविका, कन्नड भाषा पदविका, अरेबिक भाषा पदविका, मोडी पदविका, भारतीय बांग्ला भाषा, बी. एस्सी. (भौतिकशास्त्र), एम्. पी. एम. व डिएल्. एल्. अॅन्ड एलडब्लू. ११ भाषा लिहिता-वाचता येतात, रामदासस्वामी वाङ्मयाचा अभ्यास.
समर्थ रामदास आणि हनुमान
श्री. प्रणव गोखले
बी. ए. (संस्कृत) एम. ए. (संस्कृत), शैक्षणिक सल्लागार निरामय वेलनेस रीसर्च सेंटर, संपादक धर्मकोश प्रकल्प, वाई. अनेक संस्थांमधे अतिथी व्याख्याता. विश्वस्त आनंदाश्रम संस्था, पुणे; संस्कृत प्रचारिणी सभा, पुणे; संस्कृत विद्या परिसंस्था, पुणे. माजी सहाय्यक संचालक, वैदिक संशोधन मंडळ, पुणे. हरीकीर्तनोत्तेजक सभेचा दोनवेळा युवा कीर्तनकार पुरस्कार.
समर्थ रामदासांचे समाजकारण
डॉ. गिरीश बापट
एम.एस्सी. (रसायनशास्त्र), पीएच.डी. (रसायनशास्त्र). १९८९ पासून ज्ञान प्रबोधिनीचे संचालक, महाविद्यालयीन शिक्षण चालू असतानाच सामाजिक कार्य सुरू झाले. ज्ञान प्रबोधिनीच्या संचालक पदावर असताना देशात व परदेशात अनेक अभ्यास दौरे झाले. युवकांसाठी आधुनिक तंत्रज्ञाने, दासबोध, भगवद्गीता, गीतारहस्य, विवेकानंद विचार इ. विषयांचा अभ्यास, शिबिराचे संयोजन व संचालन.
बुधवार, ११ फेब्रुवारी २०२६ | संध्याकाळी ६ ते ८
सुश्राव्य गायन संध्या
सौ. मंजिरी आलेगावकर
आकाशवाणी व दूरदर्शन टॉप ग्रेड आर्टिस्ट, जयपूर घराण्याची तालीम. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या हस्ते 'कुमार गंधर्व' पुरस्कार. भारत व भारताबाहेर अनेक ठिकाणी मैफिली गाजविल्या. गेली २५ वर्षे दासनवमी उत्सवात स्वेच्छेने हजेरी लावतात.
तबला: श्री. अजित किंबहुने | संवादिनी: श्री. सौरव दांडेकर
शुक्रवार, १५ फेब्रुवारी २०२६ | संध्याकाळी ५.३० वाजता
शिवतांडव नृत्य
महाशिवरात्री निमित्त
आनंदाश्रम संस्थेतर्फे विशेष आयोजन
भावपूर्ण श्रद्धांजली
कै. माधव वझे
अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, समीक्षक, मार्गदर्शक
'श्यामची आई' मधील हाच तो श्याम
माधव माझ्या वडिलांचे विद्यार्थी आणि माझ्या मोठ्या बंधूंचे सहाध्यायी. काही दिवसांपूर्वीच स्वतःहून मला त्याने सांगितले होते, की १०० व्या उत्सवात मी 'गुरु' या विषयावर बोलणार आहे. पण योग नव्हता. त्यांचे दि. ७ मे २०२५ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले.
कै. डॉ. हेमा साने
माजी विभाग प्रमुख, वनस्पतीशास्त्र विभाग
गरवारे महाविद्यालय, पुणे
हेमाताई सुद्धा माझ्या वडिलांच्या विद्यार्थिनी होत्या. वनस्पतीशास्त्राचा चालता-बोलता ज्ञानकोश. दासनवमी उत्सवात 'वृक्षांच्या दंतकथा' यावर त्यांचे दृकश्राव्य व्याख्यान झाले होते. त्यांचे १९ सप्टेंबर २०२५ रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
कै. कुंदनताई
सेवाभावी कार्यकर्त्या
दासनवमी उत्सवात वर्षानुवर्षे सेवावृत्तीने विनातक्रार साफसफाईचे काम करणाऱ्या भगिनी कुंदनताई यांचे काही दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले.