EVENT DETAILS

Mahashivratra 2025

26 Feb 2025 Full Day
Mahashivratra 2025

Date

26 Feb 2025

Time

Full Day

Venue

Anandashram Sanstha, Pune

महाशिवरात्र

दिनांक २६-०२-२५ (बुधवार)


महाशिवरात्र दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला सर्वच शिवमंदिरात 
विविध पध्दतीने साजरी केली जाते. व ह्या सणापासूनच खऱ्या अर्थानी 
संस्थेचे उत्सव दिमाखाने चालू होतात. शिवरात्रीच्या अगोदर २-३ दिवसांपासून
स्वच्छता, सजावट, विद्युत रोषणाई, संस्थेच्या आवारांत, बाहेर व आतून केली जाते. 
विशेष म्हणजे आज संस्थेची जी परंपरा १३६ वर्ष चालू आहे  त्याचप्रमाणे
संस्थेमध्ये ११ गुरुजींसह सकाळी ८ वाजता लघुरुद्र चालू होतो. 
संस्थेमध्ये विद्यार्थ्यांची वसतिगृह असल्यामुळे संस्थेचाच विध्यार्थी पूजेला बसतो . 
९ वाजता आरती शंखनाद व ओकार गुंजनाने संपते. 

संस्थेतील सर्व विद्यार्थी संस्थेचा कर्मचारी वर्ग, संस्थेचे विश्वस्त, मित्र-मंडळी, नातेवाईक हजर असतात. 
साधारण ४० लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतो व मंदिराच्या  आवारात  ओंकाराने  भरलेल्या वातावरणांत सगळेच भारावून जातात. 
नंतर पेढ्यांचा नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद वाटण्यात येतो.  
या दिवशी सच्चिदानंद (शिवाची) खास मोगऱ्याच्या फुलांनी व वेलाने सजावट केली जाते. 

संध्याकाळी ६ वाजता पुण्यातील प्रसिद्ध सौ. रानडे ह्यांच्या ३५ जणींचा ग्रुप गेली ५ वर्षे नियमित 'शिवतांडव' स्तोत्र 
सामूहिक रित्या संगीतमय वातावरणात तालावर अतिशय मधुर आवाजात म्हणतात. 
ह्या वेळी मंदिरात आम्ही ६० जणं असतो. नंतर शंकराची आरती करून प्रसाद वाटून कार्यक्रम संपतो.